AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Konkan Tourist Guide
----------------------------------------------------------------------------------------------------------
<< Back
पडवणे किनारा (बीच)
   
विजयदुर्ग-देवगड मार्गावर देवगड पासून विमलेश्वर मंदिर 14 कि.मी. अंतरावर आहे. तेथून सुमारे 4 कि.मी. अंतरावर म्हणजेच देवगडपासून 18 कि.मी. तर विजयदुर्ग पासून 27 कि.मी. अंतरावरील समुद्राच्या शिंपल्यात एखदा अनमोल मोती लपावा तसेच निसर्गाच्या सान्निध्यात, डोंगरद-यांच्या कुशीत लपलेले पडवणे गांव. गावांच्या तिन्ही बाजूला निसर्गाच्या विविध रंगाच्या छटांनी उधळण केलेली हिरवगीगार वनराई आहे. गांवाच्या पश्चिमेला स्वच्छ,निळाशार अथांग समुद्र, त्याला लागनूनच असलेली सुरुची वनराई गांवाच्या सौंदर्यात आणखी भर घालते.
येथे जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे. येथील समुद्र किनारा स्वच्छ, विस्तीर्ण आणि स्मरणीय आहे. पश्चिमेला फेसाळलेला निळाभोर आरबी समुद्र आणि पूर्वेला वनराई असा हा सागर किनारा पर्यटकांना साद घालत आहे. डोहयांची पारणे फेडणारा हा समुद्र किनारा लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पर्यटन खात्यानेही दाद न घेतलेल्याने पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे वर्दळ नाही. या बीचचा विकास केल्यास या परिसराचा कायापालट होईल. या किना-याला निसर्गाने दिलेल्या विलोभनीय सौंदर्यामुळे भविष्यात पर्यटकांची नक्कीच गर्दी वाढेल.

येथून जवळच निसर्गाच्या कुशीत फणसे गाव आहे. गावाच्या पायथ्याशी खाडी असून तिच्या दोन्ही बाजूस चिपीच्या सुंदर हिरव्यागार झाडांचे बन आहे. फणसे गावाच्या पश्चिमेला विस्तीर्ण समुद्र किनारा बावाच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालतो. समुद्र किना-याच्या विर्स्तीण परिसरात शासनाने सुरुच्या हजारे वृक्षांची लागवड केली आहे. त्यामुळें हाही परिसर पर्यटकांसाठी स्मरणीच आहे.

<< Back
 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.