AC / Non AC Rooms
--------------------------------------
Veg / Non Veg Food Available
--------------------------------------
Rent a Car Facility
Plan Your Tour
Festivals in Konkan
   
Konkan Tourist Guide
----------------------------------------------------------------------------------------------------------
<< Back
विजयदुर्ग किल्ला
   
पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे 40 किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा आरमारी किल्ला म्हणून ओळखल्ाा जातो.

हा किल्ला इ.स.1200 च्या सुमारास शिलाहार राजाच्या कारकर्दित बांधला असावा. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.

पूर्वी हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता. म्हणूनच या किल्लयाला जलदुर्ग म्हणत. किल्ल्याच्या पूर्व बाजूला बराच मोठा खंदक होता. तो पाण्याने भरलेला असायचा. किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर लाकडी पूल होता. रात्री तो काढून ठेवला जात असे. अलिकडे तो खंदक बुजवून रस्ता तयार केला आहे.

गेली सुमारे 800 वर्षे समुद्राच्या लाटांचे तडाखे आणि ताफांचा भडीमार सहन करूनही विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. या किल्ल्याचे क्षेत्र 17 एकर 15 गुंठे असून या किल्ल्याला 20 बुरूज आहेत. त्िाहेरी तटबंदी असलेल्या या किल्ल्याच्या सर्वात बाहेरच्या समुद्राकडील तटाची उंची 36 मी. आहे. किल्ल्यात असलेल्या प्रचंड भांडारागृहावर काही वर्षापूर्वी बांधलेले विश्रामगृह आज बंद आहे. शेजारीच एक बराच मोठ बांधकाम केलेला तलाव आहे. मात्र तो कोरडाच आहे. किल्ल्यात एक बारमाही पाणी असलेली विहीर आहे.

ह्या किल्ल्याचे सौंदर्य पहाणे, त्याचे ऐतिहासिक महत्व जाणून घेणे अभ्यासकांना, जिज्ञासूंना, संशोधकांना, पर्यटकांना एक मेजवानीच ठरते. सुमारे 1 किमी. अंतरावरून हा किल्ला पाहून डोळयाचे पारणे फिटते. किल्ल्याजवळ गेल्यानंतर प्रथम आपल्याला वक्राकृती तटबंदी दिसते. मुख्य अतिसुरक्षित दरवाजाजवळ शक्तीचे प्रतीक समजले जाणारे हनुमान मंदिर आहे. त्या वेळच्या गरजेनूसार किल्ल्यावर अनेक लहान म्ाोठ्या बांधलेल्या इमारती असून त्यातील बहुतांश इमारती कोसळलेल्या आहेत. किल्ल्यात एक पुरातन वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखाली भगवान शंकर आणि भवानी मातेचे मंदिर ते असून ते अद्यापही सुस्थितीत आहे. या शिवाय तोफगोळे, दीपगृह, धान्याचे आणि दारूचे कोठार, ध्वजाचे ठिकाण, तुळशीवृंदावन, बांधकामाचा चुना मळण्याची जागा, पागा, कैदखाना, राहणा-या लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रचंड मोठ्या आकाराच्या टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबांचे ओटे इ. ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.

किल्ल्यातून विजयदूर्ग गावातील धुळपांच्या वाड्यापर्यंत सुमारे 2 कि.मी. लांबीचे एक भूयार आहे. या भूयाराच्या दोन्ही बाजूकडील मार्ग बुजले असल्याने त्यात प्रवेश करता येत नाही. येथील धुळपांचा वाडा पहाण्यासारखा आहे. या वाड्यात माडीवरच्या दिवाणखाण्यात भिंतीवर बरीच जुनी रंगीत चित्रे आहेत. दीड-दोन शतके उलटून गेली असली तरी त्यांचे रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत.

हा किल्ला समुद्राने वेढलेला असल्यामुळे समुद्राच्या अजस्र लाटा बुरूजावर सतत आदळत असतात. त्यामुळे लाटांनी बुरूजांना हानी पोहचू नये म्हणून प्रतये बुरूजाखाली समुद्राच्या बाजूने मांठेमोठे दगड टाकलेले आहेत. प्रचंड कठीण दगडावर लाटा आपटून फुटतात. त्यामुळे बुरूज सुरक्षित राहिलेले आहेत.

विजयदुर्ग किल्ल्यावरून 140 वर्षांपूर्वी हेलिअम या मूलद्रव्याचा शोध लागला होता. दि.18 ऑगस्ट 1868 रोजी खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात प्रथमच वैज्ञानिक कसोटीवर या ग्रहणाचे निरीक्षण झाले आणि फ्रेंच स्ांधोधन पिएरे ज्युल्स् सीझार जॉन्सेन तसेच ब्रीटीश खगोल तज्ज्ञ जे. नॉर्मन लॉकिअर यांनी स्पेक्ट्रोस्कोप वापरून ग्रहण काळातल्या प्रकाश वलयावरून हेमिअमचा आढळ प्रात्यक्षिकाद्वारे सिध्द केला.

या किल्ल्यापासून भल्यामोठ्या पण सुरक्षित वाघोटण खाडीची सुरूवात होते. येथे नौका विकाराचा आनंद लुटता येतो.

विजयदुर्ग हा केवळ किल्ला नसून ते एक अत्यंत पवित्र असे क्षेत्र आहे.
<< Back
 
         Guest Book          Photo Gallery         Tell-A-Friend
    
     Mobile : +91-7038709369   |   9423369557 © Nivant Resort, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.